जकार्ता,
Islamic school building collapsed सिदोअरजो येथील अल खोजिनी इस्लामिक बोर्डिंग स्कूलमध्ये आज मोठा अपघात झाला. नमाज सुरु असताना अचानक शाळेची जीर्ण इमारत कोसळल्यामुळे ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक विद्यार्थी अडकलेले आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सैन्य आणि पोलीस यांच्यासह बचाव कार्य सुरु असून, अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर आणि पाणी पुरवले जात आहे.

जीर्ण इमारतीमुळे उर्वरित भाग कोसळण्याचा धोका असल्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. जड स्लॅब कोसळल्यामुळे यंत्रसामग्रीचा मर्यादित वापर केला जात आहे. शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून, दुमजली बांधकामाचे बेकायदेशीर विस्तारीकरण चालू होते. Islamic school building collapsed इमारत कोसळल्यामुळे परिसरात घबराट पसरली असून पालक आपल्या मुलांना ढिगाऱ्याखाली शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दीही पाहायला मिळत आहे. बचाव कार्य सतत चालू आहे आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.