शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी काँग्रेसच्या खांद्यावर

30 Sep 2025 21:34:12
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
Congress review meeting : शेतकèयांच्या वर्षभराची मेहनत अतिवृष्टी व पुरात वाहून गेली. उद्ध्वस्त झालेल्या शेतकèयांच्या वेदनेची हाक, रस्त्यावर उतरून सरकारच्या कानापर्यंत भव्य मोर्चा काढून पोहोचवू, त्यांना पुरेपूर मदत मिळवून देण्याची जबाबदारी आता काँग्रेसच्या खांद्यावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर, घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत काँग्रेस नेते राम देवसरकर बोलत होते.
 
 

y30Sept-Aadhava 
 
 
 
बैठकीत अध्यक्ष तातू देशमुख, विधानसभा निरीक्षक चंद्रकात साठे, सचिन नाईक, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, शिवाजी देशमुख, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे, महेंद्र कावळे, अनिल राठोड, प्रेमराव वानखेडे, शैलेश कोपरकर, सूर्यकांता दिंडाळकर, ख्वाजा कुरेशी, सुधाकर लाहेवार, अजय माहेश्वरी, विवेक मुडे, अंबादास धुळे, तालीम शेख प्रामुख्याने हजर होते.
 
 
राम देवसरकर पुढे म्हणाले, संवेदना बोथट झालेले सत्ताधारी सध्या धर्माच्या आणि जाती जातींमध्ये भांडणे लावून, जनमानस भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्याचीही जबाबदारी तुम्हा आम्हा काँग्रेसजनांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. भविष्यात होणाèया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, मोठ्या ताकदीने आपल्याला समोर जायचे आहे.
 
 
विधानसभेतील 93 हजार मतांचा भरभक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असून, काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा लावायचा आहे. विधानसभेतील सर्वच पदाधिकाèयांपासून बुथपर्यंत सर्वांनाच कामाला लागण्याचे आवाहन यावेळी केले. एकंदरीत झालेल्या आढावा बैठकीतून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला होता. यावेळी विधानसभेतून शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0