नागपूर,
Katol Road Naka जुना काटोल रोड नाका ते राजनगर रिलायन्स पेट्रोल पंप या दरम्यान काही दिवसांपूर्वी खोदून ठेवलेल्या डांबरी रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात आले. या कामांतर्गत अर्धा रस्ता सिमेंटचा करण्यात आला; मात्र या नव्याने झालेल्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याने तो वापरण्यास पूर्णपणे असमर्थ ठरत आहे. त्यामुळे भर ट्रॅफिकमध्ये वाहनचालकांना अद्याप फक्त जुन्या डांबरी रस्त्यावरूनच जावे लागत आहे.
डांबरी रस्ता खोदून ठेवण्यासाठी जवळपास महिनाभर वेळ लागला आणि त्यानंतरच्या दुरुस्तीकरिताही तितकाच वेळ गेला. तरीही दुरुस्ती झाल्यानंतरचा रस्ता वापरण्यायोग्य नसणे, हे गंभीर असून, यामध्ये गुणवत्तेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.या कामासाठी सार्वजनिक निधीचा मोठा खर्च झाला असून,Katol Road Naka तो वाया जात असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे रस्ता विभागाचे कॉन्ट्रॅक्टर, अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी संतप्त जनतेची रास्त मागणी आहे.
सौजन्य: किशोर हजारे,संपर्क मित्र