तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
life-authority-work-band : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाèया महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कार्यरत कंत्राटी पंप ऑपरेटर व लोकल ड्युटी ऑपरेटर यांना पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सततच्या तगाद्यानंतरही निधी अभावाचे कारण देत त्यांचे वेतन थकवले जात असल्याने अखेर या कंत्राटी कर्मचाèयांनी मंगळवार, 30 सप्टेंबरपासून ‘कामबंद आंदोलन’ सुरू केले आहे.
चापडोह, निळोणा, बेंबळा, टाकळी प्रकल्पावर कार्यरत असलेल्या या कामगारांनी मजीरा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांना सामूहिक अर्ज देऊन आपल्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले. तरी देखील यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
त्यामुळे कंत्राटदाराकडून पाच महिन्यांचा पगार तातडीने मिळावा, तसेच पुढील काळात दरमहा वेळेवर वेतन मिळावे, अन्यथा कामबंद आंदोलन करू असा इशारा पूर्वीच दिला होता. अखेर या कर्मचाèयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कर्मचाèयांच्या या आंदोलनामुळे यवतमाळ शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
या आंदोलनात कंत्राटी कर्मचारी मनीष यादव, अनिकेत भगत, आकाश जोगदंड, सागर मोहोड, उमेश इंगोले, कैलास नगराळे, अविनाश चारबोळे, दर्शन जतकर, शंतनू तुरकर उपस्थित होते. याबाबत कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पणे तो होऊ शकला नाही.