महालक्ष्मी मातेपुढे राज्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना

30 Sep 2025 14:25:20
नागपूर,
Manish Nagar मधुबन लेआउट, मनीष नगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद घेतले. मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.बालगोपाळांसह माता-बंधू मोठ्या उत्सुकतेने मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. देवेंद्रजींच्या स्वागतासाठी परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. एफसीआय सोसायटीचे पदाधिकारी यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

devi 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मितहास्याने सर्व भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि महालक्ष्मी मातेपुढे सर्वांच्या सुख-समृद्धी व सुदृढ आयुष्याची प्रार्थना केली. Manish Nagarविशेष प्रसंगी नुपूर पिदडीने स्वतः रंगवलेली पणती मुख्यमंत्र्यांना भेट दिली. तिच्या व्हिलचेअर जवळ जाऊन देवेंद्रजींनी सहृदयतेने तिची विचारपूस केली
सौजन्य : आसावरी कोठीवान ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0