शक्तीची भक्ती; पावसावर मात; उद्यापासुन विसर्जन

30 Sep 2025 20:11:43
वर्धा, 
Navratri : पावसावर मात करीत नवरात्र आनंदात साजरे झाले. आज अष्टमीला सर्वच दुर्गा मंडळात होमहवन करण्यात आले. बुधवार ३० रोजी नवमीला वर्धेत दुर्गा विसर्जन होणार आहे. विसर्जन उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
 
 
JLK
 
 
अष्टमीच्या हवन नंतर सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितींकडून दुर्गा मूर्ती विसर्जनासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. नवमीच्या दिवशी शहरात मुख्य मार्गावर देवी भतांचा मोठा जनसागरच उसळतो. विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात येते. धाम नदीच्या पवनार, येळाकेळी आणि सुकळी बाई येथे शहर व परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितींकडून मूर्तीचे विसर्जन केले जाते.
 
 
नवरात्राच्या नऊ दिवसांत दुर्गा मंडळांनी सामाजिक, धार्मिक आणि जनजागृती उपक्रम राबविले. दुर्गा विसर्जन शोभायात्रा बघण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील भाविक वर्धा शहरात येतात.
 
 
१ हजार २३३ दुर्गा, १२४ शारदा मूर्तींची स्थापना
 
 
जिल्ह्यातील १९ पोलिस ठाणे क्षेत्रात १ हजार २३३ सार्वजनिक दुर्गा मूर्तींची तर १२४ ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ ते ६ ऑटोबर या कालावधीत मूर्तीचे विसर्जन होईल. पहिल्या दिवशी ३८ दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाईल. २ ऑटोबरला १७ दुर्गा आणि ३ शारदा मूर्ती, ३ रोजी ७६५ दुर्गा आणि ४१ शारदा मूर्ती, ४ रोजी २८४ दुर्गा आणि २६ शारदा मूर्ती, ६ रोजी ११७ दुर्गा आणि २९ शारदा मूर्ती तर ६ रोजी १२ दुर्गा आणि ८ शारदा मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
Powered By Sangraha 9.0