वेतन कपातीच्या निषेधार्थ विजयादशमीला एकदिवसीय उपोषण

30 Sep 2025 20:25:18
वर्धा,
one-day-hunger-strike : शिक्षा मंडळ द्वारा संचालित आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन पिपरी या संस्थेकडून सन २०१६ पासून येथील कर्मचार्‍यांना ९० टके वेतन देण्यात येते. १०० टके वेतनासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्यापही यावर कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. दरम्यान, या वेतन कपातीच्या निषेधार्थ व प्रलंबित इतर आर्थिक व प्रशासकीय समस्या निकाली काढण्याकरिता विजयादशमी २ ऑटोबर रोजी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्बारासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती गव्हर्नमेंट अ‍ॅडेड टेनिकल इन्स्टिट्यूट्स एम्प्लॉईज वेलफेअर बोर्ड संघटनेचे सचिव होमराज भगत यांनी आज ३० रोजी पत्रपरिषदेत दिली.
 
 
 
j
 
 
 
येथील कर्मचार्‍यांना वेतनापोटी शासनाकडून ९० टके तर १० टके वेतन हे संस्थेला द्यायचे आहे. सन २०१५ पर्यंत येथील शिक्षक व कर्मचार्‍यांना १०० टके वेतन मिळत होते. मात्र, सन २०१६ पासून संस्थेने ९० टकेच वेतन दिले. उर्वरित १० टया बाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. हा विषय रेंगाळलेलाच आहे. कर्मचार्‍यांचा १० टके कपात करून प्राचार्य व व्यवस्थापनाने एकप्रकारे वेठीस धरल्याचेही भगत यांनी यावेळी सांगितले.
 
 
आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन, पिपरी वर्धा या संस्थेत ५० कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी २० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. उर्वरित कर्मचार्‍यांपैकी १० कर्मचार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून संस्था आणि सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर यांच्या कार्यालयाकडे प्रलंबित थकीत वेतनासाठी विनंती अर्ज केले आहेत. आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन संस्था १० टके कपात करून वेतन देत असल्याने या कपातीपोटी कर्मचार्‍यांची जवळपास ३ कोटी रुपये थकीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अशोक घोटकर यांची उपस्थिती होती.
 
 
संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न : भार्गव
 
 
२०२४ मध्ये न्यायालयाने सरकारला रकम भरण्यासाठी शुल्क वाढवण्याचे आदेश दिले. लवकरच सरकारी आदेश येण्याची अपेक्षा आहे. संस्था सरकारकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. त्यामुळे या मुद्याचा संस्थेशी काहीही संबंध नाही. चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रीया शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0