नागपूर,
Sanjay Bhakere Foundation नागपूर नाट्यचळवळीतील अग्रगण्य संस्था संजय भाकरे फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने दोन अंकी नाटक "बाकी शून्य" याचे सादरीकरण बुधवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या प्रयोगाचे आयोजन सीनियर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट आणि संजय भाकरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.या नाटकाचे लेखक केदार देसाई असून दिग्दर्शन ऍड. अजय घारे यांचे आहे. कलाकारांमध्ये मंजुषा देव, ऐश्वर्या डोरले मोहरीर, आदित्य घुळघुळे आणि संजय भाकरे यांच्या भूमिका आहेत. निर्मिती अनिता भाकरे यांची आहे.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्यातर्फे "बाकी शून्य" या नाटकासोबतच शहरातील ज्येष्ठांचा सन्मानही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची उपस्थिती राहणार आहेSanjay Bhakere Foundation .या प्रयोगाच्या यशस्वी आयोजनासाठी सीनियर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, विदर्भ ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि फेस्कॉम पूर्व विदर्भ प्रदेश विभाग या संघटनांचे पदाधिकारी कार्यरत आहेत.या नाटकासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहरराव खर्चे, सुरेश रेवतकर, हुकूमचंद मिश्रीकोटकर, डॉ. राजू मिश्रा, अविनाश तेलंग, प्रभुजी देशपांडे आणि सुधीर भगत यांनी केले आहे.
सौजन्य:संजय भाकरे,संपर्क मित्र