भूखंड विकून आ.गायकवाड यांची अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना २५ लाखांची मदत

30 Sep 2025 21:15:41
बुलढाणा,
Sanjay Gaikwad : राज्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. सरकारकडून मदतीची घोषणा झाली आहे. परंतू अद्याप मदत पोहचू शकलेली नाही. त्याामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीचे मदत मिळाली पाहिजे यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी भुखंड विकून २५ लाखाची मदत दिली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
 
 

hjkh 
 
 
 
दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी मातोश्री जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विजय अंभोरे, गणेशसिंग राजपूत, महिला आघाडीच्या अनुजा सावळे, जिजा राठोड, कुणाल गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड उपस्थित होते. बुलढाणा मतदार संघात कुणाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत आ. गायकवाड नेहमीच करीत असतात. राज्यात शेतीपिकांवर फार मोठे नैसर्गिक आपत्तीचे संकट आहे. शेतातील पिके वाहून गेली, शेत जमिन खरडून गेली, जनावरे वाहून गेली व घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून आमदाराचे एका महिन्याचे मानधन दिले. पत्रकार परिषदेत आ.गायकवाड यांनी सांगितले बुलढाणा शहरातील त्यांचे सर्व्हे नं. ४४ मधील दोन प्लॉट विकून त्यामधून आलेली २५ लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.
 
 
 
त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मदत तात्काळ शेतकर्‍यांपर्यंत पोहचवा. तसेच त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, सर्व उद्योजक, अभिनेते, राजकीय पक्षातील पदाधिकारी , विविध प्रतिष्ठाने, सरकारी नोकरदार, पतसंस्था व इतरांनी मदत करण्यासाठी पुढे यावे कारण आज जगाचा पोशिंदा बळीराजा संकटात आहे. सरकारने पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. सरकारला शेतकर्‍यांना मदत करायची आहे. कर्जमाफी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. तसेच पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0