सूरसप्तकची लतादीदींना स्वरसुमनांजली

30 Sep 2025 12:18:41
नागपूर,
Scientific Auditorium Laxmi Nagar सूरसप्तक तर्फे सूरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खयाल-ए-लता’ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात रसिकांनी लतादीदींच्या अमर गाण्यांचा सुरेल आस्वाद घेतला.
 
 
 
69
 
‘चांदनी रात में’, ‘इतना तो याद है मुझे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘एहसान तेरा होगा मुझ पर’, ‘तुम मुझे यूँ भुला ना पाओगे’ अशा एकूण २५ लोकप्रिय गीतांनी कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात डॉ. अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, विजय देशपांडे, अरुण ओझरकर, धीरज आटे, आदित्य फडके, योगेश देशपांडे, प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार, डॉ. ऋचा येनुरकर, अर्चना उचके, लता पटेल आणि अनुजा जोशी यांनी आपल्या सुरेल गायकीने रसिकांची मनं जिंकली.Scientific Auditorium Laxmi Nagar  त्यांना नचिकेत देव यांच्या संगीत संयोजनाखाली आशिष घाटे, तुषार विघ्ने, प्रमोद बावणे, गौरव टांकसाळे, महेंद्र वाटुळकर व दीपक कांबळे यांनी वाद्यसाथ केली.सुप्रसिद्ध निवेदिका शुभांगी रायलू यांचे माहितीपूर्ण व प्रभावी निवेदन प्रत्येक गीताला साजेसे ठरले. कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवयित्री व गायिका सुचित्रा कातरकर यांची असून निर्मिती प्रा. पद्मजा सिन्हा यांनी केली.
सौजन्य:वर्षा किडे /कुळकर्णी ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0