गोंदियात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी....राजकीय वातावरण तापले

30 Sep 2025 14:27:25
गोंदिया.
Shiv Sena vs NCP in Gondia गोंदिया शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय गदारोळ उडाला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नानू मुदलियार यांच्यातील वादातून मंदिर परिसरातच हाणामारी झाली. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, धार्मिक स्थळाच्या पावित्र्यालाही धक्का बसला आहे.
 
 
Shiv Sena vs NCP in Gondia
 
ही घटना गोंदिया शहरातील मामा चौक परिसरातील मॉं दुर्गा पेंडोलमध्ये घडली. जिल्हाप्रमुख पंकज यादव दर्शनासाठी जात असताना एका तरुणाने त्यांना थांबवले. Shiv Sena vs NCP in Gondia संतापलेल्या यादव यांनी त्या तरुणाला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानू मुदलियार पुढे आले असता त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्यानंतर पोलिसांनी यादव यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यादव यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवर अद्याप कारवाई झालेली नाही.
 
 
या घटनेमुळे गोंदियात राजकीय वातावरण तापले आहे. मंदिर परिसरात झालेल्या या राड्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी आपले वाद मिटवण्याऐवजी मारहाण केल्याने पावित्र्याला धक्का पोहोचल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहराध्यक्षावर झालेल्या हल्ल्यामुळे आक्रमक झाले असून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे वाद आणखी चिघळला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तपास वेगाने सुरू असून, पोलिस कोणावर कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. धार्मिक आणि सामाजिक ठिकाणी नेत्यांचा हा गोंधळ नागरिकांना हादरवून गेला आहे.
Powered By Sangraha 9.0