मुंबई,
ST fare hike decision दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. लाल परीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशाला आता या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. महामंडळाने 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 10 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता सर्वच प्रकारच्या एसटी बसवर ही वाढ लागू राहणार आहे. त्यामुळे गावखेड्यांत जाणाऱ्या गाड्यांपासून रातराणीने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंत सर्वांनाच जादा खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट 100 रुपयांचे असल्यास आता ते 110 रुपये आकारले जाणार आहेत. दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढले असले तरीही सुरक्षिततेसाठी आणि परवडणाऱ्या दरांसाठी अनेकजण ST fare hike decision अजूनही एसटीचीच निवड करतात. मात्र आता तोच प्रवास महाग होणार आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात देखील महामंडळाने तब्बल 14.95 टक्क्यांची दरवाढ केली होती. त्यावेळी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दिवाळीपूर्वी भाडेवाढीची टांगती तलवार सर्वसामान्य प्रवाशांवर कोसळली आहे. बळीराजा अतिवृष्टीने त्रस्त असतानाच, महागाईच्या तडाख्याने गोंधळलेल्या सर्वसामान्य जनतेला दिवाळीच्या सणापूर्वी एसटी प्रवासाच्या महागाईचा आणखी एक धक्का बसणार आहे.