क्षमतांचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे : तहसीलदार येवलीकर

30 Sep 2025 19:01:37
मानोरा,
tehsildar yevalikar ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्य आदी चांगली गुण असून, ध्येयाचा पाठलाग करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात करून स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन करावे. असे प्रतिपादन तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांनी केले. स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला विज्ञान व कै. पांडुरंग ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले होते.
 
 

तहसीलदार  
 
 
प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव महादेव ठाकरे, संचालक ज्ञानदेव भोयर, पुरुषोत्तम रोकडे, प्राचार्य डॉ.एन.एस. ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. विविध स्पर्धा परीक्षा जसे की एमपीएससी, सेट परीक्षा, नीट परीक्षा आदी परीक्षेतील गुणवंताचा सत्कार सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.tehsildar yevalikar प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन एस ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुनील काळे यांनी केले. प्रा. स्नेहल ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समितीचे संयोजक प्रा.अली, सदस्य प्रा राहुल काजळकर, प्रा. विशाखा पोहरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  

एम.पी.एस. सी.परीक्षा उत्तीर्ण झालेले श्रीकांत ठाकरे,मिसबाह पटेल,सेट परीक्षामधे यश संपादन केलेले ओम नंदू राऊत, सृष्टी दत्तात्रय ठाकरे, रोशन राठोड, अंजली गावंडे, नीट परीक्षा पात्र झालेले सौरव ब्राह्मण, अफनान जाडीयावाला, गायत्री ढोले, अभिनय, कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारा दिनेश गावंडे या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0