क्वेटा,
Suicide attack in Balochistan पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील राजधानी क्वेटा येथे आज मोठा आत्मघातकी हल्ला झाला. शहरातील फ्रंटियर कॉर्प्सच्या मुख्यालयावर झालेल्या या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले असून ३३ जखमी झाले आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी १२:०३ वाजता घडलेल्या या हल्ल्यात तीन निमलष्करी सैनिकांचा समावेश आहे. अद्याप पाकिस्तानी लष्कर किंवा बलुचिस्तान सरकारने या हल्ल्याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही आणि कोणत्याही बंडखोर गटाने जबाबदारी घेतलेली नाही. घटनास्थळी सुरक्षा दलांनी ताबडतोब वेढा घालून बचाव कार्य सुरू केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झरघून रोडजवळील स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजे फुटले. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथके लगेच पोहोचली, Suicide attack in Balochistan तर फ्रंटियर कॉर्प्सचे कर्मचारीही तिथे तैनात झाले. बलुचिस्तानचे आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली असून तज्ञ, डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना ताबडतोब तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत.
घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की हल्लेखोरांपैकी एका व्यक्तीने मुख्यालयासमोर चालत्या वाहनांमध्ये स्वतःला स्फोट करून घेतले. इतर फुटेजमध्ये आत्मघातकी बॉम्बरचे साथीदार मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यानंतर फ्रंटियर कॉर्प्स आणि बंदूकधारींमध्ये गोळीबार झाला, ज्यात चार बंदूकधारी ठार झाले. बलुचिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती गंभीर असल्याचे पाहता, बलुच बंडखोर गटांव्यतिरिक्त इस्लामिक स्टेट खोरासानचा प्रभाव देखील वाढल्याचे जाणवते.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्रपती राजवाड्यात पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बलुचिस्तानमधील खनिजांचे नमुने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दाखवले होते, ज्यावरून असे मानले जात होते की अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे बलुचिस्तानमधून खनिजे काढतील. मात्र आजच्या आत्मघातकी हल्ल्यामुळे बलुचिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था आणि पाकिस्तानी सैन्याच्या कारवायांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.