आर्वी,
Navneet Rana : सुमित वानखेडे यांच्यासारखा शक्तीशाली नेता या मतदारसंघात लाभला असून हे आर्वीचं भाग्य आहे. आमदार येतात आणि जातात. पण, असा आमदार पुन्हा लाभणार नाही, असा विश्वास माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यत करीत ‘शतीशाली नेता’ अशा शब्दात आ. सुमित वानखेडे यांचे कौतुक केले.
आ. सुमित वानखेडे यांच्या पुढाकाराने आर्वीत आयोजित नवरात्री महोत्सव आणि गरबा-नृत्य स्पर्धेत माजी खासदार नवनीत राणा बोलत होत्या. पावसामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत दोन्ही दिवस हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असूनही आ. सुमित वानखेडे यांनी आपल्या जन्मगाव असलेल्या आर्वीचा विकास करण्याच्या ध्यासाने लोकसेवेचा वसा घेतला आहे. त्यांच्या कामाचा झपाटा आणि जनसामान्यातून वाढती मागणी पाहता पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचं नमूद करत राणा यांनी त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक केले. नवरात्री उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता शहराच्या एकतेचा, उत्साहाचा आणि संस्कृतीचा उत्सव ठरला, असे मत आ. सुमित वानखेडे यांनी व्यत केले. संघटन मे शती है या कार्यशैलीमुळेच इतका भव्य महोत्सव यशस्वी होऊ शकला, असे ते म्हणाले.
स्व. राजीव गांधी स्टेडियम येथे आमदार सुमित वानखेडे मित्र परिवारच्या वतीने आयोजित हा नवरात्री महोत्सव २६ आणि २७ रोजी उत्साहात पार पडला. महोत्सवाच्या दोन्ही दिवशी पाऊस पडत असतानाही उत्साहात गरबा खेळून हा महोत्सव अपेक्षेहून भव्य झाला.