आ. वानखेडेंचा कामांचा सपाटा; समस्यांचा निघतोय काटा

30 Sep 2025 21:10:08
तळेगाव (श्या.पंत), 
Sumit Wankhede : काम करणारा असला की तो शांत बसत नाही. त्याच्या सुपिक डोक्यात कायम जनताच असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत घडलेले आ. सुमित वानखेडे यांनी आपल्या मतदार संघासाठी अभिनव अभियान हाती घेतले. समस्या घेऊन आपल्या दारात येणार्‍यांच्या दारात ते स्वत: किंवा पक्षाचे पदाधिकारी पोहोचत आहेत. समस्या समजून घेत आहेत. शय झाले तर जागच्या जागीच समस्येचा काटा काढल्या जात आहे. समाधान शिबिर किंवा आमदार आपल्या गावी सोबतच घरोघरी जाऊन समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आ. सुमित वानखेडे यांनी सांगितले.
 
 
 
kl
 
 
 
आर्वी मतदारसंघात चक आमदारच नागरिकांच्या घरोघरी जात तुम्हाला काही समस्या आहे का? कुठली शासकीय कामे प्रलंबित आहेत का, शेतजमीन समस्या, रस्ते, नाल्या व इतर समस्या असेल तर त्याची नोंद घेत आहेत. समस्या असलेल्यांना ९ ऑटोबरला एका ठिकाणी येण्याची विनंती ही करण्यात ये आहे. आर्वी मतदारसंघ मोठा असल्याने प्रत्येक घरी आमदार स्वतः जाऊ शकत नसल्याने प्रत्येक गावागावात आ. वानखेडे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दारोदारी जात नागरिकांना समस्या विचारून समस्या नोंदवून घेतल्या जात आहे.
 
 
वर्धा जिल्ह्यात आमदार आपल्या दारी हा विशेष उपक्रम आ. सुमीत वानखडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली आमदारांच्या समवेत उपस्थित राहणार असुन नागरिकांनी सांगितलेल्या समस्या ९ ऑटोबर रोजी समस्या सोडवल्या जाणार आहेत. क्षेत्र भेट व समस्या निराकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष सचिन होले यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते घरोघरी पोहोचून समस्या जाणून घेत आहेत.
एरवी आपल्या समस्या घेऊन संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे नागरिक जातात.
 
 
असा आहे आमदार आपल्या दारी उपक्रम
 
 
’अंत्योदय’ म्हणजे ’अंतिम व्यक्तीचा उदय’ म्हणून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतःची जबाबदारी व कर्तव्य समजून शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांचे शासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक कामे घरोघरी जाऊन घरपोच करणे व गावाच्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आ. वानखेडे यांच्या क्षेत्र भेट व समस्या निराकरण शिबिरात करून घेणे, ऑटोबर महिन्यात शिबिर व जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0