नवी दिल्ली,
Swami Chaitanyanananda Saraswati Evidence स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या फोनमधून पोलिसांना धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांनी चैतन्यानंदला आग्रा येथील ताजगंजमधील हॉटेल फर्स्ट येथून अटक केली होती. तपासात असे समोर आले आहे की, त्याच्या फोनमध्ये अनेक महिला विद्यार्थ्यांसोबत अश्लील चॅट्स, घाणेरडे स्क्रीनशॉट्स आणि त्यांची प्रोफाइल फोटो सापडली आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरोपी अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अश्लील संदेश पाठवत होता आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
स्वामी चैतन्यानंदवर दिल्लीतील वसंत कुंज येथील एका खासगी संस्थेत १७ महिला विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी त्याला पाच दिवसांच्या कोठडीत पाठवले असून, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, त्याच्या दोन महिला सहाय्यकांनाही अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, चैतन्यानंदने पळून गेल्यानंतर सुमारे ६० लाख रुपये काढले आणि एकूण ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केला. Swami Chaitanyanananda Saraswati Evidence त्याच्याकडे असलेले दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड्सही जप्त करण्यात आले आहेत; एकामध्ये तो स्वतःला यूएनचा कायमस्वरूपी राजदूत सांगत होता, तर दुसऱ्यामध्ये ब्रिक्सचा भारतीय विशेष दूत असल्याचा दावा केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फोनमधून मिळालेले पुरावे आरोपीविरुद्धच्या लैंगिक छळ आणि धमक्यांच्या आरोपांना बळकटी देतात, तसेच त्याच्या आर्थिक फसवणुकीच्या कारवाया उघड होण्यास मदत करतात.