नवी दिल्ली,
The Baba Chaitanya case लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बाबा चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरोधात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस चौकशीत सहकार्य न करणारा आणि खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा हा बाबा आता स्वतःच्या मोबाईल फोनमुळेच अडचणीत आला आहे. पोलिस तपासात बाबाच्या फोनमध्ये अनेक मुलींसोबतचे चॅट्स आढळले असून त्यातून तो मुलींना फसवण्याचा आणि आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एवढेच नव्हे तर बाबाच्या मोबाईलमध्ये अनेक एअर होस्टेससोबत काढलेले फोटो तसेच विविध मुलींच्या मोबाईल डीपींचे स्क्रीनशॉट्स जतन केलेले सापडले आहेत. The Baba Chaitanya case चौकशीदरम्यान, बाबा पोलिसांच्या प्रश्नांना टाळाटाळ करत असून फक्त ठोस पुरावे समोर ठेवले की काही उत्तरे देत आहे. बाबाच्या दोन महिला सहकाऱ्यांना देखील ताब्यात घेऊन त्यांचा सामना घडवला जात आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीला आपल्या कृत्यांचा कुठलाही पश्चात्ताप नाही.
१६ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली बाबा चैतन्यनंद यांना दिल्ली पोलिसांनी रविवारी आग्र्यातील ताजगंज भागातील हॉटेलमधून अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन आणि एक आयपॅड जप्त करण्यात आले आहेत. सध्या ते पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत असून पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना कोठडी सुनावली आहे. वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू आहे. अटकेच्या पहिल्याच दिवशी बाबाने फळे आणि इतर वस्तूंची मागणी केली होती. पोलिसांनी त्याला केवळ फळे आणि पाणी दिले. दरम्यान, पोलिस चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी बाबांच्या फसव्या कारवायांची नवी गुपिते उघडकीस येत आहेत.