उमरखेड-महागाव तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

30 Sep 2025 21:39:26
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
umarkheed-mahagaon-rain : विधानसभा मतदारसंघात गेल्या महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असून सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते यवतमाळ दौèयावर असताना आमदार किसन वानखेडे यांनी केली.
 
 
 
y30Sept-Wankhede
 
 
 
20 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसामुळे उमरखेड व महागाव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. परिणामी शेतकèयांची पिके, माती व मशागतीसाठीची जमीन पूर्णपणे वाहून गेली.
आधीच 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीबरोबरच व्यापाèयांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जी काही पिके शिल्लक होती, तीही या पावसात नष्ट झाली आहेत. मशागतीसाठी जमिनीत मातीही शिल्लक नसल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
आर्थिकदृष्ट्या खचलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, यासाठी एनडीआरएफचे निकष डावलून विशेष बाब म्हणून तत्काळ मदत जाहीर करावी व ‘ओला दुष्काळ’ घोषित करावा, अशी मागणी आमदार किसन वानखेडे यांनी केली आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकèयांनी धीर धरावा, भरघोस मदत करू, असे आश्वस्त करून, त्यांच्या बांधावर जा, असे निर्देश दिले.
Powered By Sangraha 9.0