महिला उद्योजकांना मिळाला मंच

30 Sep 2025 13:36:17
नागपूर,
Vocal for Local भाजपच्या सेवा पखवाड्यांतर्गत आयोजित ‘व्होकल फॉर लोकल’ प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शनात कुटीर व गृहउद्योगांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते. कुटुंब सांभाळतानाच छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमा मागचा उद्देश होता.प्रदर्शनात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी आपल्या उद्योगांसाठी निधीची आवश्यकता व्यक्त केली. त्यांना MSME योजनांद्वारे आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
vocal
 
या उपक्रमासाठी भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले, तर महिला आघाडीच्या अध्यक्षा दिव्या धुर्डे यांनीही मोलाचा हातभार लावला. Vocal for Local कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा, प्रकाश माहुले व महामंत्री रूपल दोडके यांच्या अथक प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योजक, विशेषतः महिला, यांना आपली कला व कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. परिणामी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सौजन्य : रूपल दोडके, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0