वर्धा,
Sai Baba Punyatithi Festival : श्री साई सेवा मंडळाच्या वतीने २ ते ७ ऑटोबर दरम्यान साईबाबा पुण्यातिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक साईबाबा मंदिरात करण्यात आले आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, शिर्डी येथील साईबाबांच्या मुळ पादुकांचेही दर्शन वर्धेकरांना होणार आहेत.

गुरुवार २ रोजी सकाळी ७.३० वजता पवनार येथील धाम नदीतील कावडीतून आणलेल्या पाण्याने अभिषेक, दुपारी ४.३० वाजता साईबाबा पालखी, ३ रोजी सकाळी ८.३० वाजता लघुरुद्राभिषेक, सायंकाळी ५ वाजता श्री दत्त उपासना, ७ वाजता एक शाम साई के नाम ही भजन संध्या, ४ रोजी सकाळी ९.३० वाजता सामूहिक विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवदगीता व सामूहिक अथर्वशीर्ष पठन, सायंकाळी ७ वाजता डॉ. अमित लांडगे व श्वेता घाटे सायंकार यांची अभंगवारी, ५ रोजी सकाळी ९ वाजता श्री साई सच्चरित्र सामूहिक पारायण, सायंकाळी ४ वाजता साई बाबांची पालखी शोभायात्रा निघेल. सोमवार ६ रोजी सकाळी १० वाजता मयुर महाराज दरणे यांचे गोपालकाल्याचे कीर्तन तर सायंकाळी हिंगणघाट येथील साईस्वर यज्ञच्या वतीने भजन संध्या होणार आहे. तसेच दररोज दुपा विविध भजन मंडळांचे भजन होईल. उत्सव काळात साईबाबांचे आरती सायंकाळी ६ वाजता होईल.
साईबाबा पुण्यतिथी महोत्सवातील कार्यक्रमांना जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष घनश्याम सावळकर, सचिव सुभाष राठी, विठ्ठल व्यवहारे, टिपन्ना भंडारी, अनुप कृपलानी आदींसह विश्वस्त मंडळाने केली आहे.