नवी दिल्ली,
Women World Cup 2025 : महिला विश्वचषक २०२५ ची सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने झाली. यावेळी, विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर चामारी अटापट्टू श्रीलंका संघाचे नेतृत्व करत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताचा प्लेइंग इलेव्हन: स्मृति मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देयोल, हरमनप्रीत कौर (कप्तान), जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांति गौड़, श्री चरणी.
श्रीलंकेचा प्लेइंग इलेव्हन: चमारी अट्टापट्टू(कप्तान), हासिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, विशमी गुणरत्ने, कविशा दिलहारी, नीलाक्षिका सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, अचिनी कुलसुरिया, उदेशिका प्रबोधनी, इनोका राणावीरा.