नागपूर,
World Heart Day कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सलन्स (KSE) येथे “वर्ल्ड हार्ट डे” साजरा करण्यात आला. प्लेटिना हार्ट हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात आरोग्य जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला.या प्रसंगी डॉ. सिद्धी सराफ व सीईओ चेतन गुप्ता (प्लेटिना हार्ट हॉस्पिटल) उपस्थित होते. प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सीपीआर प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासाने व कौशल्यपूर्ण रीत्या प्रतिसाद देता यावा, तसेच जीव वाचविण्याचे महत्त्वपूर्ण तंत्र शिकता यावे, हा उद्देश या सत्रामागे होता.
या वर्षीच्या “Catch Them Young 2025” व “Be a Heart Hero” या संकल्पनेशी सुसंगतपणे विद्यार्थ्यांना संतुलित आहार, साखर-मिठाचा अतिरेक टाळणे, जंक फूडपासून दूर राहणे, तसेच आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.World Heart Day कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते सीपीआरचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, ज्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रथमोपचारकर्ता म्हणून कार्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला.या उपक्रमाचे चेअरमन प्रतिभा घाटे व डायरेक्टर,प्रीती कानेटकर यांनी कौतुक केले. शाळेची शिक्षणाबरोबरच सामाजिक आरोग्याबाबतची बांधिलकी त्यांनी गौरवली. कार्यक्रमाचे निवेदन स्मिता बाकडे यांनी केले.
सौजन्य: डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र