जुन्या वादातून चुलत भावाला मारहाण उपचारादरम्यान मृत्यू : तिघांना अटक

30 Sep 2025 21:41:31
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
beating over old dispute : दोन चुलत भावांत जुना वाद होता. शनिवार, 20 सप्टेंबरला 57 वर्षीय नामदेव भोजराज राठोड यांना त्यांचा चुलतभाऊ राहुल रमेश राठोड याने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या नामदेवचा उपचारादरम्यान 27 सप्टेंबरला मृत्यू झाला. आर्णी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.
 
 

jkl 
 
 
 
तक्रारदार किशोर सीताराम राठोड यांच्या तक्रारीवरून नामदेव राठोड यांना मारहाण केल्यावरून राहुल राठोड व त्याच्या दोन सोबत्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवतमाळात उपचार करून पुढील नामदेव राठोड यांना नागपूरला पाठवण्यात आले होते. या भांडणात राहुल राठोडने नामेदव राठोडला छाती व डोक्यावर काठी व विटांनी मारहाण करून जबर जखमी केले होते.
अधिक तपास केला असता त्यामध्ये आणखी आरोपी असल्याचे पुरावे समोर आले. शनिवारी जखमी नामदेव राठोड उपचार घेत असताना नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात मरण पावले.
या प्रकरणी राहुल रमेश राठोड (वय 35), कपिल रमेश राठोड (वय 27) व गोविंद मनोहर राठोड (वय 34) यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे व ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि प्रशांत देशमुख तपास करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0