बुलढाणा
Gram Panchayat राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी "मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना" संदर्भात शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन शासन निर्णयान्वये मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या निधी निकषात बदल करुन मुदतवाढ देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील,चिखली विधानसभा मतदारसंघात 5 ग्रामपंचायतीना नवीन इमारत मिळणार असून या पाच इमारती चिखली विधानसभा मतदारसंघात खेचून आणण्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार विकास कन्या सौ श्वेता महाले पाटील यांचे विशेष परिश्रम राहिले आहे.
ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांनुसार ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि त्यासोबत नागरी सुविधा केंद्र खोली (CSC Room) मंजूर करण्यासाठी पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींकरीता नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली या उद्दिष्टाच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३००० पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही, अथवा धोकादायक व मोडकळीस आलेली आहे अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिल्या होत्या.
संचालक, पंचायत राज यांनी वरील निकषानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतींची यादी मागविली होती. त्यानुसार प्राप्त प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यातील, चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी "मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना" योजनेतर्गत परवानगी मिळाली आहे.
या सादर केलेल्या प्रस्तावाचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी विविध प्रकारे पाठपुरावा करून चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अधिकाधिक ग्रामपंचायतींना नवीन इमारत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून ग्रामपंचायत यांना नवीन इमारतीसाठी सुमारे प्रत्येकी 20 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होणार असून पाच ग्रामपंचायती या चिखली विधानसभा मतदारसंघातील आहेत. या अभियानानुसार चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखला,जाम्ब,काटोडा,दिवठाणा,पिंपरखेड या ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत मिळणार आहे.