म्हणून बिग बी ट्रोल...

    दिनांक :05-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Amitabh Bachchan महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणेशोत्सव पंडालांपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाला तब्बल ११ लाख रुपयांचं देणं दिलं आहे. बिग बी यांनी स्वतः उपस्थित न राहता आपल्या टीममार्फत पंडाल समितीला हा धनादेश सुपूर्द केला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साल्वी यांनी चेक स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

Amitabh Bachchan 
अमिताभ बच्चन यांच्या या उदारतेचं अनेकांनी स्वागत केलं असलं तरी सोशल मीडियावर काहींनी त्यांच्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. नेटिझन्सचा आरोप आहे की, सध्या पंजाब भीषण पुराच्या संकटाशी झुंज देत आहे, अशा वेळी तेथील लोकांना मदत करणे अधिक गरजेचं होतं.
काही Amitabh Bachchan यूजर्सनी प्रतिक्रिया देताना लिहिलं – “पंजाबसाठी केलं असतं तर जास्त आनंद झाला असता”. आणखी एका युजरने म्हटलं – “पंजाबच्या लोकांना मदत करा बाऊजी, देवाला नव्हे तर माणसांना मदत करण्याची वेळ आहे”. काहींनी असा सल्लाही दिला की, “पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घेतलं असतं तर गणपती बाप्पालाच ती खरी सेवा ठरली असती”.दरम्यान, लालबागच्या राजाच्या ट्रस्टींनी देणगी मिळाल्याची पुष्टी केली असून पंडालात भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

पंजाबला पूराचा जबरदस्त फटका
पंजाब सध्या १९८८ नंतरच्या सर्वात भीषण पूरस्थितीचा सामना करत आहे. आतापर्यंत १,३०० हून अधिक गावे पाण्याखाली गेली असून, सुमारे ३ लाख एकर क्षेत्रातील धान आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, मृतांचा आकडाही वाढत आहे.