A new Nagpur will take shape नागपूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. नवीन नागपूरच्या उभारणीसाठी एनएमआरडीएने हुडको (HUDCO) आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार नागपूरमध्ये आधुनिक सुविधांनी युक्त नवीन शहर उभारले जाणार असून, येत्या काही वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे.
नवीन नागपूर प्रकल्पासाठी NBCC ही प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार (म्हणून काम करणार आहे. हा प्रकल्प 1710 एकर जमिनीवर विकसित होणार असून अत्याधुनिक सुविधा, आधुनिक वसाहती, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असेल. नागपूरला देशातील प्रमुख स्मार्ट आणि सस्टेनेबल शहरांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यासोबतच नागपूरसाठी आणखी एक भव्य योजना आखण्यात आली आहे. नागपूरच्या आजूबाजूला 148 किमी लांबीचा आऊटर रिंगरोड उभारला जाणार असून, यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार, शहरातील प्रदूषण घटणार आणि नागपूरला देशातील इतर शहरांशी अधिक सुलभपणे जोडले जाणार आहे. A new Nagpur will take shape या दोन प्रकल्पांसाठी हुडकोकडून एकूण 11,300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी 6,500 कोटी रुपये नवीन नागपूर प्रकल्पासाठी तर 4,800 कोटी रुपये नागपूर आऊटर रिंगरोडसाठी वापरण्यात येणार आहेत. या करारामुळे नागपूरला विकासाची नवी गती मिळणार असून, नवीन नागपूर आणि आऊटर रिंगरोडमुळे येत्या काळात नागपूरचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दर्जा अधिक उंचावणार आहे. शहरातील नागरिकांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.