साउथचे दोन महानायक पुन्हा एकत्र

    दिनांक :08-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Rajinikanth Kamal Haasan साउथ इंडस्ट्रीला उंचीवर नेण्यात अनेक कलाकारांचे योगदान आहे, मात्र यात सर्वात मोठा वाटा रजनीकांत आणि कमल हासन यांचा आहे. रजनीकांत यांनी कॉमर्शियल सिनेमांच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली तर अभिनयाचा बादशाह म्हणून कमल हासन यांचे नाव घेतले जाते. हे दोन्ही कलाकार केवळ भारतातच नव्हे तर परदेशात आणि हिंदी प्रेक्षकांमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.
 

Rajinikanth Kamal Haasan  
एक काळ असा होता की हे दोघे अनेक चित्रपटांत एकत्र झळकले, पण गेल्या 40 वर्षांत ते कोणत्याही चित्रपटात सोबत दिसले नाहीत. मात्र आता ही प्रतिक्षा संपणार आहे. एसआयआयएमए (SIIMA) पुरस्कार सोहळ्यात कमल हासन यांनी या महामिलनाची घोषणा केली. कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आले की ते पुन्हा रजनीकांतसोबत दिसतील का? त्यावर कमल म्हणाले, “कसे होईल ते माहीत नाही, पण जर प्रेक्षकांना ते आवडले तर आम्ही पुन्हा नक्कीच एकत्र दिसू. पूर्वी आम्हाला एकच बिस्किट मिळायचे, त्याचे अर्धे करून आम्ही समाधानी होतो. आता पुन्हा आम्ही एकत्र येत आहोत.”
कमल हासन Rajinikanth Kamal Haasan  आणि रजनीकांत यांनी आतापर्यंत तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये मिळून तब्बल 21 चित्रपट केले आहेत. त्यातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. या दोघांचा शेवटचा एकत्रित प्रकल्प 1985 मध्ये आलेला ‘गिरफ्तार’ हा बॉलिवूड चित्रपट होता. यात अमिताभ बच्चन आणि कमल हासन प्रमुख भूमिकेत होते, तर रजनीकांत यांची खास झलक होती.
सध्या या नव्या प्रोजेक्टबद्दल अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. मात्र चर्चेनुसार, या दोन्ही सुपरस्टार्सना दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या चित्रपटात एकत्र पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार दशके ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा रजनीकांत आणि कमल हासन मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.