लडाखमध्ये सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ अवतार

    दिनांक :08-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Salman Khan बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान सध्या आपल्या नव्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहे. मागील दोन चित्रपटांमध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आलं. ‘टायगर 3’ अपेक्षेपेक्षा कमी चालली आणि ‘सिकंदर’च्या अपयशाने त्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे आता ते आपल्या पुढच्या प्रोजेक्टवर संपूर्ण लक्ष देत आहेत.
 

 Salman Khan Battle of Galwan 
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी सलमानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सुरुवातीला या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत होणार होतं. मात्र शेवटच्या क्षणी निर्णय बदलण्यात आला आणि आता या चित्रपटाच्या आवश्यक सीनचं शूटिंग थेट लडाखमध्ये सुरू झालं आहे.
अलीकडेच सलमान खान मुंबई विमानतळावर आर्मी जॅकेट घालून दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लडाखमधील शूटिंगदरम्यानची एक फोटो व्हायरल झाली आहे. या फोटोत सलमान वर्दीत दिसत असून, डोंगरांच्या कुशीत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असल्याचं स्पष्ट होतं.लडाखमध्ये शूटिंग करणं कलाकार आणि क्रूसाठी मोठं आव्हान आहे. अत्यंत थंड हवामान, उंच डोंगराळ भाग आणि थंड पाण्यात स्टंट करणे या सर्व गोष्टींमुळे टीमला कठीणाई येणार आहे. मात्र दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांना वाटतं की चित्रपटातील युद्धदृश्यं वास्तवदर्शी दाखवण्यासाठी लडाखमध्येच चित्रीकरण गरजेचं आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सलमानच्या या पहिल्या लुकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता मेकर्सकडून या चित्रपटाबद्दल मोठं अपडेट केव्हा समोर येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.