वर्धा,
Wardha district जिल्ह्यात विविध विकासकामांसह पर्यटनाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. या कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी)कडे सोपविण्यात आली आहे. याच पृष्ठभूमीवर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध कामांची पाहणी केली आणि विभागाच्या अधिकार्यांना प्राथमिक अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले.
शहराचे सुशोभीकरण आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर विशेष प्रयत्नशील आहेत. क्रीडा प्रेमींसाठी वर्धा येथे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची योजना राबविण्यात येत असून त्यासंबंधी सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी डॉ. दीक्षित यांना दिली. हे संकुल सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणार आहे. Wardha district तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि एमटीडीसी कार्यालय परिसराचीही पाहणी करण्यात आली.
वर्षानुवर्षे शहरात असलेले मध्यवर्ती कारागृह बाहेर हलविण्याची योजना देखील आखण्यात आली असून इंझाळा येथे प्रस्तावित जागेचे डॉ. दीक्षित यांनी प्रत्यक्ष अवलोकन करून आवश्यक निर्देश दिले. सेवाग्राममधील सायन्स व सोलार पार्कलाही या पथकाने भेट दिली. Wardha district पर्यटनाच्यादृष्टीने बोरधरण अत्यंत आकर्षक असून, येथील विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. दीक्षित यांनी नमूद केले. येथे पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, नौकाविहार सुविधा तसेच बंगळुरूच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यान विकसित करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या भागात मत्स्य व्यवसायालाही चालना देण्याबाबत चर्चा झाली.
त्यानंतर केळझर येथील अष्टविनायक गणेश मंदिर, बुद्ध टेकडी तसेच इतर पर्यटनस्थळांची पाहणी करून विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. Wardha district या दौर्यात एमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता प्रशांत पाग्रुट, कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.