चोरीच्या दोन ट्रॉलीसह दोघे गजाआड

10 Jan 2026 18:37:54
गोंदिया,
Tractor trolley theft, Gondia police action स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ९ जानेवारी रोजी ट्रॅक्टरच्या चोरी गेलेल्या दोन ट्रॉली जप्त करून दोन आरोपींना अटक केली. विश्वनाथ भांडारकर (३९) व नरेश मेंढे (२७) दोन्ही रा. खमारी असे आरोपींची नावे आहेत.

 Tractor trolley theft, Gondia police action
आमगाव तालुक्यातील घाटटेमणी येथील कृष्णकुमार दोनोडे यांच्या घरासमोर ठेवलेली ट्रॅक्टरची ट्रॉली ५ जानेवारी रोजी अज्ञात आरोपींनी चोरी केली होती. याप्रकरणी आमगाव पोलिस तपास करीत असताना विश्वनाथ भांडारकर व नरेश मेंढे यांनी ट्रॉली चोरल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही खमारी येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घाटटेमणी येथून ५ जानेवारीला तसेच २४ डिसेंबर २०२४ रोजी रिसामा येथून एक ट्रॉली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून चोरी केलेली एक ट्रॉली आमगाव परिसरातून तर एक ट्रॉली लाडसा (म.प्र.) येथून ताब्यात घेतली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार राजू मिश्रा, पोलिस हवालदार भुवनलाल देशमुख दीक्षितकुमार दमाहे, प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, भोजराज बहेकार, पोलिस शिपाई संतोष केदाम व राम खंदारे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0