भारत प्राथमिक मराठी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

10 Jan 2026 17:10:18
रिसोड,
bharat primary marathi school येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत ७ जानेवारी रोजी माजी खासदार तथा दि. आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यक्षा जयश्री देशमुख होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, नरेंद्र देशमुख, छाया खके आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रदूषण टाळा, निसर्ग वाचवा हा निसर्गसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणार्‍या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनीतील विद्यार्थ्यांनी साकारलेली विविध चित्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
 

स्नेहमिलन  
 
 
यावेळी मुख्याध्यापिका किरण दुबे यांनी प्रास्ताविकात स्नेहसंमेलनाचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करत, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते जय अनंत या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी दी आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी आपल्या मनोगतात स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला व कौशल्यांच्या विकासाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या अध्यक्षा जयश्री देशमुख यांनी आपल्या मनोगतात स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत विरंगुळा मिळतो. अशा सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.bharat primary marathi school प्रमुख अतिथी प्रतीक्षा तेजनकर म्हणाल्या की, शिक्षण हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असावे. पालक, शिक्षक व शाळा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडत असते. शाळेने राबविलेले शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार व नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.
कार्यक्रमास प्राचार्य संजय भांडेकर, प्राचार्या मंजुषा देशमुख, मधुकर शिंदे, तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शीला उकळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय वाघ यांनी केले तर नयुम शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0