नागपूर,
Tekdi Ganesh Temple विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक व नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिरात मंथनी–हैदराबाद येथील गणेश भक्तांच्या वतीने पूर्वसंकल्पानुसार १०८ वा गणपती अथर्वशीर्ष सहस्रावर्तन अभिषेक भक्तिभावात संपन्न झाला.
सप्टेंबर २०२२ पासून एकूण १२१ सहस्रावर्तन अभिषेक करण्याचा संकल्प या गणेश भक्तांनी घेतला असून, त्यानुसार आतापर्यंत हैदराबाद, सिकंदराबाद, मंथनी आदी ठिकाणी तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात विविध सहस्रावर्तन अभिषेकांचे आयोजन करण्यात आले आहे. Tekdi Ganesh Temple याअंतर्गत १०९ वा सहस्रावर्तन अभिषेक रामटेक येथील अठराभुजा गणपती मंदिरात, तर ११० वा अभिषेक श्रीक्षेत्र आदासा येथील शमी विघ्नेश मंदिर परिसरात संपन्न झाला.
यावेळी गाणपत्य अभ्यासक प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी विदर्भातील अष्टविनायकांची माहिती देत उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या Tekdi Ganesh Temple यशस्वी आयोजनासाठी प्रभाकर मारपकवार यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक विनोद महावादी यांच्यासह अशोक रामपल्ली, सुरेश रेवतकर आणि विवेक खर्डेनवीस यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: प्रदीप खर्डेनवीस, संपर्क मित्र