कामठीतील देवी मंदिरात तोडफोडीचा प्रयत्न

10 Jan 2026 19:10:28
नागपूर,
Kamthi कामठी शहरातील एका देवीच्या मंदिरात एका महिलेने तोडफोड करण्याचा तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच मंदिर परिसरात तसेच आजूबाजूच्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली व संबंधित महिलेला पुढील नुकसान करण्यापासून रोखले. उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेने यावेळी काही लोकांना जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
 
  
Kamthi
 
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. Kamthi दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मंदिराच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची तसेच संबंधित महिलेविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
सौजन्य: भारती रोटे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0