थेट रामललाच्या मंदीरात नमाजपठण!

10 Jan 2026 16:24:09
अयोध्या,
 
 
ayodhya-namaz-kashmir श्री रामललाच्या दर्शनाला दररोज लक्षावधी भाविक अयोध्येत दाखल होतात. मंदीर परिसराच्या सुरक्षेचे दाखले दिले जात असताना, आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नार्थक चिन्ह लागले आहे. मंदिराच्या दक्षिणी परकोटाच्या भागात एक व्यक्ती नमाज पठण करताना आढळला. तो काश्मिरी असून, नमाज पठण थांबिवले असता त्याने आक्षेपार्ह घोषणा देण्यास सुरुवात केली.
 
 
 
ayodhya-namaz-kashmir
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
ayodhya-namaz-kashmir दरम्यान, सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणा या गंभीर प्रकारची तपासणी करीत आहेत तर, मंदीर प्रशासन आणि ट्रस्टने मात्र मौन साधले आहे. दक्षिण परकोटातील सीता रसोईजवळ, काश्मिरी वेशभूषेत हा व्यक्ती नमाज करीत होता. तो श्रीराम मंदीराच्या डी1 प्रवेशद्वारातून आत शिरला होता. त्याचे नाव अहमद शेख असून, तो काश्मिरातील शोपियांचा रहिवासी आहे. सुरक्षा रक्षकांनी नमाज थांबविताच अहमद शेखने घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर, पोलिसांनी त्याला अटक केली.
 
 
 
 
ayodhya-namaz-kashmir श्रीराम मंदीरात नमाज पठण करण्याचा उद्देश आणि त्या व्यक्तीची पृष्ठभूमी या बाबींचा पोलिस सखोल तपास करीत आहेत.  दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने कोणतेही औपचारीक निवेदन जाहीर केलेले नाही. ही एक संवेदनशील आणि गंभीर घटना असून, पूर्ण तपासानंतरच काही औपचारीक माहिती जाहीर केली जाणार आहे. कोणतीही अफवा पसरू नये आणि सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाऊ नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0