मिशन परीवर्तन अवैध धंदे प्रतिबंधात्मक उपाययोजनेत भरीव योगदान : जिपो अधिक्षक निलेश तांबे

10 Jan 2026 19:02:51
बुलढाणा, 
 
 
buldhana-police-drugs मिशन परिवर्तन या अभिनव अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. गांजा, एम.डी. ड्रग्ज आदी १०३ प्रकरणांत ११८ आरोपींना अटक करत सुमारे १३ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यासोबतच ८०० किलोहून अधिक अंमली पदार्थ सुरक्षितरीत्या नष्ट करण्यात आले खून, दरोडेखोरी, अवैध गुटखा यासह अनेक गुन्हयांचा तपास करण्यात आला आहे. buldhana-police-drugs जिल्हा पोलीस दलाने गुन्हे उकल, कायदा व सुव्यवस्था, अवैध धंद्यांवरील कारवाई तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अत्यंत भरीव व उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लिष्ट व गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल करत पोलीस दलाने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, अशी माहिती जिपो अधिक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.
 
 

buldhana-police-drugs 
 
 
buldhana-police-drugs जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पत्रकार पोलिस संवाद कार्यक्रमाचे तसेच पत्रकार परिषदेचे अयोजन दि. १० जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अमोल गायकवाड, स्था.गु शाखेचे पोलिस निरीक्षक अंबूलकर इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते. २०२५ मध्ये जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये सुमारे १० टक्के घट झाली असून, दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी सुमारे ८० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. खुनाच्या ५६ पैकी ५५ गुन्हे, दरोड्याचे सर्व ७ गुन्हे उघडकीस आणत तब्बल २ कोटी ७७ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. buldhana-police-drugs जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या शेकडो प्रकरणांतून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. . कारवाईसोबतच युवकांमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य, चित्रकला, निबंध व सायलोथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अवैध दारू, जुगार, गुटखा, गौण खनिज (रेती) चोरी, आर्म अ‍ॅट, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत हजारो केसेस दाखल करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
 
buldhana-police-drugs अवैध रेती चोरीप्रकरणी तडीपार व एमपीडीए अंतर्गतही कारवाई करण्यात आली. सायबर फसवणूक प्रकरणांतून तक्रारदारांना लाखो रुपये परत मिळवून देण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेनेही विविध प्रकरणांत आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानभरपाईसारखा मुद्देमाल हस्तगत केला. हरविलेले ५३३ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यात आले. अपहरण व मिसिंग प्रकरणांतून शेकडो महिला, buldhana-police-drugs मुली व पुरुषांचा शोध घेण्यात यश आले आहे. वर्ष २०२५ मध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने विविध कायद्यांतर्गत हजारो केसेस दाखल करत एकूण सुमारे ५९ कोटी ७३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले असल्याचे जिपो अधिक्षक निलेश तांबे यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0