मोठी बातमी! दहावी–बारावी परीक्षेवर ड्रोनची नजर

10 Jan 2026 14:53:13
पुणे,
Maharashtra ssc hsc exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकोप व गुणवत्तापूर्ण आयोजन सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने आता राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना केली आहे. ही समिती परीक्षा काळात कॉपीमुक्त वातावरण राखण्यासह विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षेची जबाबदारी पार पाडेल, तर परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही नियंत्रण जिल्हा प्रशासनाकडे ठेवण्यात आले आहे.
 

CCTV exam monitoring, Maharashtra ssc hsc exam-drone-cctv-surveillance 
शालेय शिक्षण Maharashtra ssc hsc exam विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, दहावी–बारावीच्या परीक्षांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जातील. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, सदस्यांना परीक्षा कालावधीत केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. विभागीय परीक्षा मंडळांनी ‘उपद्रवी’ व ‘संवेदनशील’ म्हणून ओळखल्या गेलेल्या परीक्षा केंद्रांवर प्रभावी व्यवस्था राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.राज्यस्तरीय समिती शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. या समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षण योजना संचालक व राज्य मंडळ सचिव यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश परीक्षांचा शांततामय व तणावमुक्त पर्यावरण तयार करणे, तसेच राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवणे आहे.
 
 
जिल्हास्तरावर कार्यरत Maharashtra ssc hsc exam समितीची जबाबदारी परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा परीक्षेच्या एक दिवस आधी सुनिश्चित करणे, उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची माहिती संकलित करणे, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सतत देखरेख ठेवणे, तसेच प्रश्नपत्रिकांची वाहतूक सुरक्षित पद्धतीने करणे अशी आहे. त्याचबरोबर, भरारी व बैठी पथकांसह पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था देखील केली जाईल. भरारी पथकात किमान एका महिला प्रतिनिधीचा समावेश आवश्यक आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास त्यामागील व्यक्ति, सहाय्यक तसेच प्रत्यक्ष गुन्हेगारांवर दखलपात्र तसेच अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जातील. तसेच, परीक्षा केंद्राजवळील ५०० मीटरच्या परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने बंद करण्याचे आदेशदेखील दिले आहेत.राज्यस्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून हे सर्व उपाय योजले जात असल्याने, यावर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा अधिक सुरक्षित, शांततामय आणि विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरणात पार पडण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0