चंद्रपूर,
chandrapur-district-bar चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार, 9 जानेवारी रोजी पार पडली. त्यात ‘खजांची-भागवत-मोगरे-लाभे’ वकिलांच्या पॅनलने ‘हजारे-पुराणकर, सातपुते-बेग’ पॅनलचा दारूण पराभव केला आणि दणदणीत विजय मिळविला. येत्या 2026-28 या वर्षांकरिता अध्यक्षपदी अॅड. विजय टंडन, उपाध्यक्षपदी अॅड. अमन मारेकर, तर सचिवपदी अॅड. अभिजीत किन्हीकर हे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. विजय टंडन यांना 483, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. श्रीधर झाडे यांना 427 मते मिळाली. अॅड. टंडन 56 मताधिक्याने विजयी झाले. तर उपाध्यक्षपदासाठी अॅड. अमन मारेकर यांनी, अॅड. प्रविण पिसे यांचा 57 मतांनी पराभव केला.
chandrapur-district-bar अॅड. मारेकर यांना 483, तर अॅड. पिसे यांना 426 मते मिळाली. तसेच सचिवपदाच्या निवडणुकीत अॅड. अभिजित किन्हीकर तब्बल 118 मतांनी विजयी झाले. अॅड. किन्हीकर यांना 512 मते प्राप्त झाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड. कपील भगत यांना 394 मतांवर समाधान मानावे लागले. सहसचिवपदी अॅड. तृप्ती मांडवगडे, कोषाध्यक्षपदी अॅड. मुर्लीधर बावनकर, ग्रंथपालपदी अॅड. राहुल थोरात यांनीही आपला झेंडा रोवला. महिला राखीव गट सदस्यपदी अॅड. सरोज कदम, अॅड. राजलक्ष्मी रामटेके, अॅड. महेश्वरी सोनुले हे विजयी झाले. तर सदस्यपदी अॅड. सपना शेट्टी, अॅड. आकाश गिरी, अॅड. वर्षा उपाध्याय, अॅड. शरीफ मिर्झा, अॅड. सुरेश दुर्गम, अॅड. अमोल वैद्य, अॅड. मनोज मिश्रा, अॅड. सोपान जवंजार, अॅड. प्रतिभा येलेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
chandrapur-district-bar विजयानंतर विजयी पॅनलने जल्लोष साजरा केला. ही निवडणूक अॅड. प्रशांत खजांची, अॅड. रवींद्र भागवत, अॅड. विजय मोगरे, अॅड. अजीत लाभे, अॅड. मुंकूद टंडन, अॅड. प्रकाश सपाटे, अॅड. विनायक बापट, अॅड. राकेश बोरीकर, अॅड. अभय पाचपोर, अॅड. प्रकाश बजाज, अॅड. गिरिश मार्लिवार, अॅड. राकेश ठाकूर, अॅड. आशिष धर्मपूरीवार, अॅड. रंजन खटी, अॅड. निलेश चोरे यांच्या मार्गदर्शनात व सहकार्यातून लढविण्यात आली.
chandrapur-district-bar बार असोशिएशनच्या विकासासाठी कार्य करूः अॅड. टंडन
नवनियुक्त अध्यक्ष अॅड. विजय टंडन यांनी, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन हा माझा परिवार असून, त्याच्या कल्याणासाठी येणार्या कार्यकाळात मी व माझी कार्यकारिणी उत्तमपणे काम करू, असे आश्वासन दिले.