वर्धा,
chandrapur-man-eater-tiger चंद्रपूर जिल्ह्यातील एक नर आणि एक मादी वाघाला निसर्गमुत करावे किंवा त्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवावे याविषयी शिफारस करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कार्यरत सात सदस्यीय तज्ज्ञ समितीची विशेष बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत दोन्ही वाघांवर ठपका ठेवत कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यात यावे, असे एकमत तज्ज्ञांचे झाले.
chandrapur-man-eater-tiger ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणार्या मूल परिसरातून १६ सप्टेंबर २०२५ रोजी टी-२२६-एफ-एस१-एफ सब अॅडल्ट मादी वाघ तर बफर क्षेत्रातील मोहर्ली/इरई धरण परिसरातून ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रेस्यू करण्यात आलेल्या टी-९१ च्या नर बछड्याला निसर्गमुत करावे की बंदिस्त ठेवावे, याविषयी शिफारस करण्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञांच्या समितीची शुक्रवार ९ रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत संबंधित प्रकरणाची मांडणी पाठक यांनी केली. त्यानंतर वरिष्ठ समितीतील सातही सदस्यांनी त्या मादी व नर वाघाच्या वर्तवणुकीविषयी चर्चा केली. या दोन पट्टेदार वाघांनी ५ व्यतींना ठार केले आहे.
chandrapur-man-eater-tiger शिवाय त्यांचे वर्तवणूक हे मनुष्यावर हल्ला करणारी असल्याने त्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यात यावे, यावर एकमत झाले. तशी शिफारस प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे करण्याचे निश्चित करण्यात आले. आता याच शिफारसीचा विचार करून पीसीसीएफ (वन्यजीव) हे निर्णयाला मूर्तरुप देणार आहेत. सध्या हे दोन्ही पट्टेदार वाघ चंद्रपूर येथील वन्यप्राणी बचाव केंद्रात आहेत. त्यांना आगामी काळात गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रात हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रात बंदिस्त करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांना ठेवण्यात येते. पण, या ठिकाणीही सध्या रेस्क्यू केल्यानंतर बंदिस्त करण्यात आलेले आणखी वन्यप्राणी ठेवण्यासाठी जागा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे दोन्ही पट्टेदार वाघांना सध्या चंद्रपूर येथील बचाव केंद्रात ठेवण्यात येणार आहे. पण, आगामी काळात जागा उपलब्ध झाल्यावर त्यांना गोरेवाडा येथे हलविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले.