उमेदवारांमध्ये माजी महापौर कंचर्लावार सर्वाधिक श्रीमंत

10 Jan 2026 18:01:53
चंद्रपूर,
Chandrapur municipal election, महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले. त्यात महानगरपालिकेच्या माजी महापौर व चंद्रपूर नगरपरिषद असतानाच्या माजी नगराध्यक्ष कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे.

Chandrapur municipal election,
भाजपाच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांच्याकडे 8 कोटी 85 लाख 17 हजार रूपयांची जंगम व 1 कोटी 13 लाख 4 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. कंचर्लावार यांना दोनदा महापौर पदावर कार्य करण्याची संधी मिळाली होती. तर आता अपक्ष उमदेवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांच्याकडे 1 कोटी 41 लाखांची जंगम, तर 1 कोटी 73 लाखांची स्थावर मालमत्ता तसेच 30 लाख 67 हजारांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
सोबतच काँग्रेसच्या उमेदवार व पहिल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांच्याकडेही 51 लाख 26 हजार जंगम व 17 लाख स्थावर मालमत्ता असून, 12 लाख 39 हजारांचे कर्ज आहे. अंजली घोटेकर यांच्याकडे 29 लाख 80 हजार जंगम व 86 लाख 80 हजारांची स्थावर मालमत्ता आहे.
15 जानेवारी रोजी चंद्रपूर महानगर पालिकाची निवडणूक होणार असून, 451 उमेदवार रिंगणात आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नामांकन अर्ज दाखल करताना बंधनकारक असलेले शपथपत्र या सर्व उमेदवारांनी महानगर पालिका प्रशासनकडे सादर केले. या शपथपत्रात शैक्षणिक पात्रता, जंगम व स्थावर मालमत्ता, कर्ज, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकेल, अशी गुन्हेगारी प्रकरणे व ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले आणि एक वर्षे किंवा त्यापेक्षा कालावधीच्या कारावासाची शिक्षा झाले असेल, अशा प्रकरणांची नोंद करणे बंधनकारक होते.उमेदवारांनी प्रशासनाच्या परिशिष्ट-1 मध्ये प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार 451 पैकी 53 उमेदवार कोट्याधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोट्याधीश असलेले बहुतांश उमेदवार भाजपाशी संबंधित असून, काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आहे. निवडणूक लढविणार्‍या 13 उमेदवारांकडे जंगम व स्थावर मालमत्ता निरंक असल्याची नोंद शपथपत्रात केली आहे. यामध्ये महाकाली प्रभागातील उमेदवारांची संख्या अधिक आहे.
आठ वर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. यंदाच्या निवणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांचा संख्या अधिक दिसून येत आहे. यात एमए. बीएसस्सी, एमएस्सी, एमकॉम., एमएसडब्लू, बीएड., एलएलबी, अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र, शाखेची पदवी घेऊन निवडणूक लढविणार्‍याची संख्या 162 आहे. 2017 च्या तुलनेत ही संख्या बरीच वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0