अनिल कांबळे
Nagpur police MCOCA राज्यात अंमली पदार्थ विक्रीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गृहमंत्रालय आणि पाेलिस विभाग सातत्याने सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. मात्र, गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून पळवाटा शाेधून पुन्हा ड्रग्ज तस्करी करीत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करांवर कठाेर कारवाई करण्यावर पाेलिसांनी भर दिला. त्यामुळे ठाणे पाेलिस आयुक्तालयानंतर नागपूर पाेलिसांनी राज्यातील दुसरा मकाेका अंतर्गत कारवाई केली आहे. समीर अहमद सगीर अहमद (वय 30, कामगार नगर, कमर काॅलनी), इमरान उफर् इमू उफर् पचपन अहमद सगीर अहमद (वय 28), आकाश भगीरथ सय्याम (वय 26 भिमवाडी झाेपडपट्टी, पिली नदी, यशाेधरा नगर) आणि साेनू सत्तार शेख (वय 26, रा कामगार नगर, कपिल नगर) अशी मकाेका कारवाई केलेल्या टाेळीची नावे आहेत.
नागपूर पाेलिस आयुक्त डाॅ. सिंगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबवून ड्रग्ज विक्री Nagpur police MCOCA आणि तस्करी करणाèयांची कंबर माेडली आहे. त्यांनी शहरातील विविध महाविद्यालय, वस्ती, झाेपडपट्टी आणि संस्थांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन जनजागृती केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक ड्रग्ज तस्करांची धरपकड करुन कठाेर कारवाई करण्यावर पाेलिसांनी भर दिला आहे. मानकापूर पाेलिसांनी 85 ग्रॅम एमडीसह समीर अहमद, त्याचा भाऊ इमरान अहमद, आकाश सय्याम यांना अटक केली. त्यांना ड्रग्ज पुरविणारा आराेपी साेनू सत्तार हा फरार झाला. त्याचा शाेध पाेलिस घेत आहे. या टाेळीकडून जवळपास 13 लाख रुपयांचा मुद्देमाल मानकापूर पाेलिसांनी जप्त केला. या टाेळीतील समीर अहमद आणि इमरान अहमद यांच्यावर आतापर्यंत कामठी, सीताबर्डी, जरीपटका, कपीलनगर आणि पाचपावली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ ैजान अहमद यासुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून ताेसुद्धा रडारवर आहे. त्यांच्यावर जवळपास 24 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या अहमद भावंडांवर कठाेर कारवाई करण्यासाठी ठाणेदार सतीश आडे यांनी मकाेकाचा प्रस्ताव तयार करुन वरिष्ठांकडे पाठवला. वरिष्ठ अधिकाèयांनीही प्रस्तावाला मान्यता देऊन चाैघांविरुद्ध मकाेका कारवाई केली. राज्यातील ही दुसरी मकाेकाची कारवाई असून पहिला कारवाई ठाणे पाेलिसांनी केली आहे.ड्रग्जमुक्त शहर करण्यावर नागपूर पाेलिसांचा भर आहे. त्यामुळे युवा पीढीला बरबाद करणाऱ्या ड्रग्ज विक्रेत्या आणि तस्करांची हयगय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठाेर कारवाई करुन गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात येत आहे.

नवीनचंद्र रेड्डी (सहपाेलिस आयुक्त, नागपूर)