जिजाऊ गाथा महोत्सवाचे उदघाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन

10 Jan 2026 18:57:13
बुलढाणा,

Jijau Gatha Festival, inauguration राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील लखुजीराजे जाधव राजवाडा परिसरात आयोजित जिजाऊ गाथा महोत्सवचे शुक्रवारी उत्साहात उदघाटन झाले.'

Jijau Gatha Festival, inauguration 
या उदघाटन सोहळ्याला आ. मनोज कायंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, अ‍ॅड. नाझेर काझी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दि. ९ ते १२ जानेवारीदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी (दि. ९) गडगर्जना हा कार्यक्रम सादर करण्यात आला. दि. १० रोजी ‘जिजाऊ वंदना — महाराष्ट्राची लोकधारा दि. ११ रोजी महाराष्ट्राच्या लोकवाद्यांचा समावेश असलेला वारसा संस्कृतीचा हा अनोखा संगम तर दि. १२ रोजी ढोल-ताशा, लाठी-काठी व मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. उदघाटन दिनी सादर झालेल्या गडगर्जना या कार्यक्रमाला जिजाऊ भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
Powered By Sangraha 9.0