मानोरा,
Leopard attack तालुयातील गव्हा शेत शिवारात हिंस्त्र वन्य पशुचा वावर वाढल्याने वन प्रशासनाने या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी अथवा सामान्य नागरिकाचा बळी अथवा जखमी होऊ नये या आधीच आवश्यक ती सुरक्षात्मक पावले उचलण्याची मागणी रोहीच्या पिल्लाला बिबट्याने शिकार करून खाल्ल्याने पुढे येत आहे.
स्थानिक शेतकरी सरस्वती भिमराव ठाकरे यांच्या गव्हा येथील गट क्रमांक ५२२ मध्ये या परिसरामध्ये ठाण मांडून बसलेल्या वाघाने (बिबट) रोही या वन्य प्राण्याच्या बछड्याची शिकार केल्याची घटना कारखेडा येथील माजी सैनिक तथा माजी वन कर्मचारी गजानन सोळंके यांनी प्रत्यक्ष बघितली. वन प्रशासनामध्ये काम केलेले सोळंके यांनी मृत रोहिच्या पिल्याजवळ शिकारी हिंस्त्र पशूची विष्ठा आढळून आल्याने हे बिबट असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहिती दिली.
गव्हा नजीकच्या विठोली, कारखेडा, आसोला, आमदरी पंचक्रोशीतील विशेषतः शेतकर्यांनी आणि नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा माजी वन कर्मचारी सोळंके यांनी केली असून, वन प्रशासनाने या हिस्त्र पशुचा उपद्रव मानवाला होण्याआधी आवश्यक ती सुरक्षात्मक पावले उचलण्याची मागणी केली आहे.