मुंबई,
mazi ladki bahin yojana राज्यातील अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या योजनेच्या हप्त्यांबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात प्रथम mazi ladki bahin yojana नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतील निधी वितरणाला तात्पुरता ब्रेक लागला होता. तरीही सरकारकडून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे अद्याप न मिळाल्याने लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष या हप्त्यांकडे लागले आहे.
दरम्यान सूत्रांकडून mazi ladki bahin yojana मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींची यंदाची मकरसंक्रांत गोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या चार ते पाच दिवसांत डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. १४ किंवा १५ जानेवारी रोजी प्रत्येकी ३,००० रुपये जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.या संभाव्य निधी वितरणावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांचे मतदान होत असून, त्याआधी लाभार्थी महिलांना निधी वितरित झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका आणि सरकारचा अंतिम निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता लाभार्थी महिलांना मकरसंक्रांतीपूर्वीच हप्ता मिळणार की महापालिका निवडणुका पार पडल्यानंतरच निधी खात्यात जमा होणार, याबाबत स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा कायम आहे.