मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासातून सुवर्णयश

10 Jan 2026 14:31:58
नागपूर,
medal winners राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात हिवाळी २०२४ व उन्हाळी २०२५ परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. एकूण १४० प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १९४ सुवर्ण, ८ रजत व २७ रोख पारितोषिके असे २२९ पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 

मेडल  
 
 
बी.ए. एलएलबी अभ्यासक्रमात सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी मिळवत पाच सुवर्ण पदके व दोन पारितोषिके पटकावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी क्रतिका शंकर धोटे म्हणाल्या, “या यशामागे माझ्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे पाठबळ आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम सुरू ठेवावेत. यश उशिरा का होईना, पण मिळतेच.”
धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थेतील एमबीए अभ्यासक्रमात सहा सुवर्ण पदके मिळवलेल्या सुचेतन गभने यांनी सांगितले, “मेहनतीला पर्याय नाही. सातत्य आणि परिश्रमामुळेच मी नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएचडीसाठी प्रवेश घेतला आहे. प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.”
एम.ए. (बुद्धिस्ट स्टडीज) मध्ये सहा सुवर्ण पदके मिळवलेल्या डॉ. अर्चना किसन लाळे म्हणाल्या, “नियमित स्व-अभ्यास हा माझ्या यशाचा आधार आहे. शिक्षण स्वीकारण्याची तयारी असेल, तर वय आणि व्यवसाय अडथळा ठरत नाही.” त्या व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असून यापूर्वी आंबेडकर विचारातही त्यांनी सुवर्णयश मिळवले आहे.
बॅचलर ऑफ जर्नालिझम परीक्षेत तीन सुवर्ण पदके व दोन पारितोषिके मिळवलेल्या प्राची वामनराव ठाकरे म्हणाल्या, “हा सन्मान मला पत्रकारितेत अधिक जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देतो.medal winners शिक्षक, कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरले.”
एलएल. बी. मध्ये ५ सुवर्णपदके प्राप्त करणाऱ्या तथागत ठाकूर यांनी मेहनत आणि जिद्द हेच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. तर, यशवंत महाविद्यालय, वर्धा येथील निवेदिता फुसाटे हिला एम. ए मराठी मध्ये ५ सुवर्णपदके मिळाली आहेत. आपल्या या यशाबद्दल बोलताना शैक्षणिक प्रवासात यशाची उंची गाठण्यासाठी शिक्षक आणि त्यांचे मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचे ठरते. तसेच मनातील जिद्द आणि आत्मविश्वास देखील फार महत्वाचा ठरतो असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0