नागपूर,
West Samarth Nagar पश्चिम समर्थ नगर येथील आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमास जागतिक कीर्तीचे शेफ व विविध खाद्यपदार्थांच्या विक्रमांचे मानकरी विष्णू मनोहर (BFA Professor Emeritus) यांची उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख अतिथी विष्णू मनोहर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या सर्वच क्षेत्रांतील प्रगतीचा गौरव करत, “शाळेचा चढता आलेख अत्यंत कौतुकास्पद असून, या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,” असे सांगितले. यावेळी धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. West Samarth Nagar इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, ‘संस्कृती ते समृद्धी’, दक्षिण भारताचा प्रवास, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित संगीत-नाट्य, भारतातील ऋतू, भारतीय नृत्यकला आणि शाळेचा प्रवास अशा विविध विषयांवर आधारित उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांभवी देशमुख, राजश्री गोजे, ओवी व्यास आणि चि. सर्वेश खेकाळे या विद्यार्थ्यांनी केले. त्यांना तृषा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी, पर्यवेक्षिका अमृता नगरकर, कार्यक्रम विभाग प्रमुख सोनाली भागवत तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. West Samarth Nagar विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे मत मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी यांनी व्यक्त केले. नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाबद्दल धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. उल्हास औरंगाबादकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सौजन्य: प्रीती लांबे, संपर्क मित्र