हृदयद्रावक! तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू

10 Jan 2026 12:28:31
परभणी,
three warkaris dead  मराठवाड्यातील परभणीत किर्तनानंतर घराकडे परत येत असताना आज पहाटे भयंकर अपघात घडला. या अपघातात तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरातील वारकरी संप्रदायात दुःखाची लाट पसरली आहे. मृत्यू झालेल्या वारकऱ्यांमध्ये दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज कदम आणि प्रसाद महाराज कदम यांचा समावेश आहे.
 

three warkaris dead  
घटनास्थळावरून three warkaris dead  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना परभणी-झिंतूर महामार्गावरील झरी गावाजवळ लोअर दुधना डाव्या कालव्याजवळ घडली. वारकऱ्यांनी किर्तन आटोपल्यानंतर मध्यरात्री सुमारे एक ते दोन वाजताच्या सुमारास परभणी-झिंतूर मार्गे बोर्डी गावाकडे दुचाकीने निघाले होते. त्या वेळेस एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले.अपघातानंतर तिघेही घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. मृतकांची वय, गाव व नावं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतक माऊली दिगंबरराव कदम (वय ३०, रा. बोर्डी, ता. झिंतूर), प्रसादराव कदम (वय ४५, रा. बोर्डी, ता. झिंतूर) आणि दत्ता माणिकराव कऱ्हाळे (वय ३०, रा. मुडा, ता. झिंतूर) हे होते.
 
 
वारकऱ्यांच्या या three warkaris dead  अनपेक्षित मृत्यूने स्थानिक समुदायात शोककळा पसरली असून, परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायातील सदस्य अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून नोंदणी केली असून, अपघाताचा तपास सुरु आहे.परभणी-झिंतूर महामार्गावर अलीकडेच अनेक अपघात झाले असल्याने स्थानिक रहिवाशांनी या मार्गावर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0