आष्टेडू आखाडा स्पर्धेत पोरवालच्या विद्यार्थिनींची भरारी

10 Jan 2026 13:37:10
नागपूर,
Ashtedu wrestling competition राज्यस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेसाठी एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय, कामठी येथील रागिनी ठाकरे आणि सोम्या मेश्राम या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. आष्टेडू आखाडा राज्यस्तरीय निवड स्पर्धा सिंचन भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सेवाग्राम-वर्धा रोड येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत दोन्ही विद्यार्थिनींनी दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. दोन्ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेच्या आहेत.
 
nagpur
 
राज्यस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धा दिनांक २० व २१ जानेवारी २०२६ रोजी गांधी भवन, पवनी तहसील, पवनी, जिल्हा भंडारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. Ashtedu wrestling competition या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मल्लिका नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्निल दाहात, उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक व्ही. बी. वंजारी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
 

nagpur  
सौजन्य: डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0