मुंबई तोडता येणार नाही म्हणून शिवसेना फोडली

10 Jan 2026 20:42:21
पुणे, 
 
sanjay-raut-bjp-shivsena अमित शहांनी मुंबई लुटली आहे. अमित शहांच्या कंपनीला एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. ज्यादिवशी हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडून जाईल तेव्हा भाजप एकनाथ शिंदे यांना लाथा घालून बाहेर काढेल, अशी अभद्र शब्दांतील टीका देखील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. मुंबई तोडता येणार नाही म्हणून शिवसेना फोडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. sanjay-raut-bjp-shivsena ते पुण्यात बोलत होते. भाजपला नगरपालिका, ग्रामपंचायत सगळी सत्ता हवी आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतात आणि सत्तेत बसवतात. सत्तेत बसवलेले अजित पवार हे ज्वलंत उदाहरण आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
 
 
 
sanjay-raut-bjp-shivsena
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
sanjay-raut-bjp-shivsena लोकशाही भाजपच्या बापाची आहे का? महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. राऊत म्हणाले,‘भाजपचा फेकनामा प्रसिद्ध केला आहे. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला पाहिजे. फेकाफेकीसाठी मोदी आणि फडणवीस यांना नोबेल दिला पाहिजे.’ काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेली भाजपा आता काँग्रेसयुक्त झाल्याची टीका राऊत यांनी केली. मुंबई मराठ्यांची शान आहे. sanjay-raut-bjp-shivsena मुंबई महाराष्ट्राची  राजधानी आणि मराठी माणसाची आहे. 106 लोकांनी बलिदान दिलं आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. तोडायची नाही तर केंद्रशासीत प्रदेश करायचा असल्याचे राऊत म्हणाले. आपल्या शैलीत त्यांनी भाजपा आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर पातळी सोडून टिका केली.
Powered By Sangraha 9.0