आजपासून बोरतीरावर चालणार हरिनामाचा गजर

10 Jan 2026 19:50:08
विजय माहुरे
 
सेलू, 
 
selu-kejaji-maharaj-ghorad विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बोरतीरी वसलेल्या तीर्थक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला रविवार ११ पासून सुरुवात होत असून बोरतिरी दहा दिवस हरिनामाचा गजर चालणार आहे. दहा दिवस चालणार्‍या या धार्मिक महोत्सवात भतिमय वातावरणात भतिरंग उधळत भतिरसाचा आनंद भाविकांना मिळणार आहे.
 
 
 

selu-kejaji-maharaj-ghorad 
 
 
 
selu-kejaji-maharaj-ghorad संत केजाजी महाराज यांचा ११९ वा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजता दिंडी मार्गाने ग्रंथ मिरवणूक निघणार आहे. या ग्रंथ मिरवणुकीत भजन मंडळी व भाविकांचा सहभाग राहणार आहे. ग्रंथ मिरवणूक झाल्यानंतर श्रीराम कथा ज्ञान यज्ञाला सुरुवात होईल. ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ आळंदी येथील गाथामूर्ती प्रमोद महाराज ठाकरे असून श्रीराम कथा प्रवते आळंदी येथील रामायणाचार्य विश्वंभर महाराज माळोदे असणार आहेत.
 
 
selu-kejaji-maharaj-ghorad श्रीराम कथा दुपारी १ ते ४ व रात्री ७.३० ते १० या दोन सत्रात चालणार आहे. काकडाआरती सकाळी ५.३० वाजता, महाआरती सकाळी ६ वाजता, हरिपाठ सायंकाळी ६ वाजता असणार आहे. गाव विद्युत रोषणाई व तोरण पताकांनी सजले आहे. गावातील प्रत्येकजण पुण्यतिथी महोत्सवात वाट्याला येईल ती कामे करीत असून गावात दिवाळीचा सण असल्याचे दिसून येत आहे. या महोत्सवाला आळंदी, विदर्भातील भंडारा, गोंदिया येथील संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक उपस्थित राहणार आहे. विदर्भाबाहेर गुजरात राज्यात संत केजाजी महाराजांप्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक असून येथेही मंदिर आहे.
 
 
 
selu-kejaji-maharaj-ghorad येथील भाविक मोठ्या संख्येने या पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावणार आहे. भाविकांच्या निवासाची व्यवस्था भत निवासात केली आहे. यासाठी विठ्ठल रखुमाई ट्रस्ट, संत केजाजी सेवा मंडळ व ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मंदिर विद्युत रोषणाईने सजले असून गावातील रस्ते तोरण पताकांनी नटले आहे. घोराडमध्ये हा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे प्रती दिवाळीचा सण आहे. या महोत्सवात घरोघरी पाहुणे मंडळींची रेलचेल राहणार असून ५० हजाराहून अधिक भाविक हजेरी लावणार आहेत.
 
selu-kejaji-maharaj-ghorad ग्राम स्वच्छता अभियान
या महोत्सवानिमित्त ग्राम स्वच्छता अभियान दहा दिवस राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात पहाटे ४.३० वाजता होणार आहे. या अभियानात गावातील बालगोपाल, युवक व वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग असणार आहे. हे अभियान १० दिवस चालणार असून या अभियानाला ग्रामपंचायत प्रशासन सहभागी व्हावे, अशी मागणी आहे. या अभियानात सतीश तेलरांधे, मंगेश हांडे, बारसू निमजे, ज्ञानेश्वर माहूरे, नागो पोहाणे, उदय लाल, सुधाकर खराबे, आदींचा पुढाकार राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0